पंधरा चित्रपटांचा स्पर्धेत सहभाग : तीन भारतीय, तर बारा आंतरराष्ट्रीय,‘कंट्री फोकस’मध्ये फ्रान्सचा सन्मान
प्रतिनिधी /पणजी
पणजीत 20 रोजी ते 28 रोजी दरम्यान होणाऱया 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केवळ 15 चित्रपट प्रति÷ित सुवर्ण मयूराच्या शर्यतीत आहेत. यात सौंदर्यशास्त्र आणि राजकारणातील उदयोन्मुख ट्रेंडचे प्रतिनिधीत्त्व करणाऱया 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. सर्वत्र गाजलेला विवेक अग्निहोत्री यांचा ’काश्मिर फाईल्स’ या भारतीय चित्रटाचाही समावेश आहे.
आंचिमच्या तिसऱया आवृत्तीपासून हा पुरस्कार आशियातील सर्वाधिक महत्त्वाच्या चित्रपट पुरस्कारांपैकी एक आहे.
पुरस्कारासाठी निवड समिती नियुक्त
या पुरस्कारासाठी निवड समितीची नियुक्ती करण्यात आली असून यात इस्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माता जिंको गोटोह, प्रेंच चित्रपट संपादक पास्केल चॅव्हन्स, प्रेंच डॉक्मयुमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बार्चुरेन आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा समावेश आहे.
‘काश्मिर फाईल्स’चाही समावेश
यंदाच्या सुवर्ण मयूराच्या टक्करीच्या स्पर्धेत क्रिस्झटॉफ झानुसी निर्मित पॉलिश चित्रपट पर्फेक्ट नंबर, मेक्सिन फिल्ममेकर कार्लोस कायसर यांचा रेड शूज, दारिश मेहरजुई यांचा अ मायनर, नो एंड, इस्त्रायली दिग्दर्शक महा हज मेडिटेरिनियन फिव्हर, फिलीपिनो फिल्ममेकर लाव डायज यांचा व्हेन द वेवज आर गॉन, आय हेव्ह इलेक्ट्रीक ड्रीम्स, कोल्ड एज मार्बल, द लाईन, सेव्हन डॉग्ज, मारिया ः द ओशन एंजल, सर्वत्र गाजलेला विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स, नेझो, अनंत महादेवन यांचा द स्टोरीटेलर, कुरूंगू पेडल या चित्रपटांचा समावेश आहे.
‘कंट्री फोकस’मध्ये फ्रान्सचा सन्मान
महोत्सवाचा यंदा ‘कंट्री फोकस’ हा विभाग फ्रान्स या देशावर आधारित असणार आहे. यात 9 समकालीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपटातून फ्रान्समधील सिनेमाची विविधता आणि समकालीनता प्रदर्शित करण्यात येणार आहे. कंट्री फोकस हा असा विभाग आहे ज्यात एका देशाच्या सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा आणि योगदानाचा उत्सव साजरा केला जातो.
‘अदर पीपल्स चिल्ड्रन’ ने उद्घाटन
या विभागाचे उद्घाटन ‘अदर पीपल्स चिल्ड्रन’ या चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय स्त्राrबद्दलची शोकांतिका सांगणारा आहे. फ्लोरेन्स मायल्हे यांचा ‘द क्रॉसिंग’, बेले ऍण्ड सेबेस्टीयन, बिट्वीन टू वर्ल्डस्, द वेल्वेट क्वीन, सिक्सटीन, द व्हॅनिश्ड प्रेसिडेंट, द ग्रीन पर्फ्यूम या चित्रपटांचा समावेश आहे.