ऑनलाईन टिम : कुपवाडा
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ही कारवाई सिमा सुरक्षा दलांने केली. याबाबतची माहीती काश्मीर पोलीस प्रमुखांनी सांगितली असून या दहशतवाद्याचा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे सांगितले.
कुपवाडा पोलिस दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहमे दरम्यान या दहशतवाद्याचा खातमा करण्यात गेला. कुपवाड्यातील लोलाब भागात ही चकमक झाली.
या मोहीमेचा एक भाग म्हणून संयुक्त पथक दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांचा शोध घेत होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी संयुक्त सुरक्षा पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी जाग्यावरच ठार झाला, तर एकास ताब्यात घेतले असून त्याचे नाव शौकेत अहमद शेख आहे.