वृत्तसंस्था/ गॅस्टेड
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या गॅस्टेड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा 23 वर्षीय टेनिसपटू कास्पर रुडने इटलीच्या बेरेटेनीचा पराभव करत एकेरीचे जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड आणि विद्यमान विजेता कास्पर रुडने इटलीच्या मॅटो बेरेटेनीचा 4-6, 7-6 (7-4), 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत जेतेपद पुन्हा स्वतःकडे राखले. हा अंतिम सामना अडीच तास चालला होता. 2022 च्या टेनिस हंगामातील रुडचे हे तिसरे जेतेपद असून त्याने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील 9 स्पर्धां जिंकल्या आहेत.