Tarun Bharat

कस्तुरबा मातोश्री हायस्कूल नवी ईमारत आणि साधनसुविधांसह आता सज्ज

प्रतिनिधी /पणजी

पणजी शहरातील सर्वात जुन्या शिक्षणसंस्था?पैकी एक असलेल्या कस्तुरबा मातोश्री हायस्कूलच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ आता सर्व साधनसुविधानी सज्ज झालेल्या नव्या ईमारतीतून होणार आहे आणि  पणजी तसेच आसपासच्या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठीही ती आनंदाची बातमी ठरावी.

पोर्तुगीज काळात 1936 साली  म्हणजे 85 वर्षांआधी  काही समाजधुरीणानी एकत्र येऊन सुरू केलेल्या कन्या शळेचे  रूपांतर मुक्तीनंतर लगेच कस्तुरबा मातोश्री हायस्कूल मध्ये झाले आणि आज पणजी रोटरी क्लबच्या मदतीने सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून हायस्कूलच्या ईमारतीचा कायापालट करण्यात आला असून शाळेसाठीच्या सर्व सुविधा आता उपलब्ध असल्याची माहिती स्त्री शिक्षण प्रवर्तक मंडळाचे अध्यक्ष नरेश शिरसाट यांनी पत्रकारितेचा परिषदेत दिली. पणजी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव मराठे आणि संस्थेचे  सदस्य वामन प्रभू यांची यावेळी हजेरी होती.  

पणजी रोटरी क्लबने सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून संस्थेच्या सुमारे 85-90 वर्षे जुन्या ईमारतीचे आता पक्क्या तीन मजली ईमारतीत रूपांतर केले असून प्रशस्त वाचनालय , प्रयोगशाळा आणि सभागृह ही नव्या ईमारतीला वैशिष्टय़? आहेत. ईंग्रजी माध्यमातून  पाचवी ते दहावीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे.  जुनी ईमारत मोडकळीस आल्याने निर्माण झालेली समस्या आता पक्क्या ईमारतीमुळे दूर झाली आहे. मागील शैक्षणिक वर्षात या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असेही शिरसाट यानी सांगितले. 

सामाजिक सेवेच्या कर्तव्यातून पणजी रोटरी क्लबने या शाळेच्या व्यवस्थापनाने केलेली विनंती मान्य करून ईमारतीला नवे रूप दिले असे राजीव मराठे यांनी  सांगितले. त्या कामी अनेकानी मदत केल्याची माहिती देताना नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी नव्या इमारतीचे उदघाटन होईल असे सांगितले. संस्थेचे नारायण कामत , मुख्याध्यापिका वीणा थळी  यांचीही उपस्थिती यावेळी होती.

Related Stories

सांखळी परिसरात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात

Amit Kulkarni

कोविड महामारीचे निर्बंध पाळून उत्सव साजरा करा

Amit Kulkarni

गुळे येथे ट्रकच्या धडकेत 11 गुरांचा बळी

Amit Kulkarni

जगदिश भोबे यांचा मगोतून गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश

Patil_p

आजपासून रेड अलर्ट जारी

Omkar B

बुजवलेल्या खड्डय़ांचा आकार पुन्हा वाढला

Amit Kulkarni