Tarun Bharat

कॅटरिनाच्या ‘फोनभूत’चे पोस्टर सादर

Advertisements

7 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये झळकणार

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा आगामी चित्रपट ‘फोन भूत’ मागील काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर मंगळवारी सादर करण्यात आले आहे. पोस्टरसह चित्रपटातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा लुक देखील समोर आला आहे. याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तही जाहीर करण्यात आला आहे. फोन भूत चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कॅटरिनासोबत ईशान खट्टर तसेच सिद्धांत चतुर्वेदी दिसून येत आहे. पोस्टरवर ‘भयानक कॉमेडी’चा अनुभव मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘फोन भूत’चे पोस्टर कॅटरिनाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले आहे. तसेच ‘फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे, 7 ऑक्टोबर रोजी नजीकच्या चित्रपटगृहांमध्ये येतोय’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. ईशानने पोस्टर शेअर करत स्वतःच्या व्यक्तिरेखेचे नाव उघड पेले आहे.

पोस्टरमध्ये कॅटरिना, ईशान आणि सिद्धांत यांच्यासह जॅकी श्रॉफ, सीबा चढ्ढा आणि नीधि बिस्ट देखील दिसून येत आहे. सीबा आणि नीधि चित्रपटात भूताचे पात्र साकारताना दिसून येत आहेत. तर जॅकी श्रॉफ यांनी तांत्रिकाची भूमिका साकारल्याचे समजते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. तर रवि शंकरन आणि जसविंदर सिंह बाथ यांनी याची पटकथा लिहिली आहे. एक्सेल एंटरटेनमेंटकडून याची निर्मिती केली जात आहे. फोन भूतसह कॅटरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ तर श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

Related Stories

ओटीटीमध्ये ‘लायन्सगेट प्ले’ची एंट्री

Patil_p

सलमान खानला विमानतळावर रोखणाऱया सीआयएसएफ जवानाचा मोबाईल जप्त

Tousif Mujawar

सईच्या डान्सला लाइक्सची फोडणी

Patil_p

कंगना करणार 20 किलो वजन कमी

tarunbharat

शाहिदच्या ‘जर्सी’चे पहिले पोस्टर

Patil_p

गोविंदा महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर

Patil_p
error: Content is protected !!