Tarun Bharat

केसीआर आणि प्रशांत किशोर यांची दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरूच

ऑनलाईन टिम : नवी दिल्ली

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि प्रशांत किशोर यांच्यातील चर्चा रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. शनिवारी हैदराबादला विमानाने उतरलेले प्रशांत किशोर यांनी दिवसभर चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘प्रगती भवन’ येथे मुक्काम केला.

केसीआर हे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)चे प्रमुख आहेत. रविवारी प्रशांत किशोर यांनी पुढील वर्षी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)ची रणनीती, तसेच केंद्रात राष्ट्रीय पर्यायासाठीच्या त्यांच्या योजनांबद्दल चर्चा केली. केसीआर यांचे पुत्र आणि टीआरएसचे कार्याध्यक्ष के.टी. रामाराव यांनीही प्रशांत किशोर यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

काँग्रेस नेतृत्वाबरोबर अलीकडेच झालेल्या बैठकींमुळे, तसेच त्यांच्या कॉंग्रेस पक्षात सामील होण्याच्या चर्चेच्या पार्श्वभुमीवर प्रशांत किशोर यांची केसीआर बरोबरची चर्चा महत्त्वाची ठरते. प्रशांत किशोर यांच्या टिमने तेलंगणातील 89 विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल केसीआर यांना समजाउन सांगितला आहे असे समजते. यापुर्वी ३० मतदारसंघात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल त्यांनी टीआरएस अध्यक्षांना दिला आहे.

Related Stories

सीमाभागातील मराठी माणूस दहशतीखाली- खासदार धैर्यशील माने

Abhijeet Khandekar

५ हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

कोल्हापूर : विना परवाना वाहनधारकांवर गगनबावड्यात कारवाई

Archana Banage

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कारखान्‍यातर्फे गगनबावडा तालुक्‍यासाठी रूग्‍णवाहिकेचे लोकार्पण

Archana Banage

शेतकरी आंदोलन स्थगित

datta jadhav

Madhya Pradesh OBC Reservation : महाराष्ट्रात आरक्षणाचं काय? भाजपाचा मविआला सवाल

Archana Banage