शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांचे नाव सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत एक मताने संमत करण्यात आले त्यामुळे विद्यमान संचालक नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व गणपतराव पाटील यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
या बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल नाईक निंबाळकर यांनी आगामी होणारी निवडणुकीत गणपतराव पाटील यांच्या बरोबर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले त्या सर्व उपस्थितांनी हात उंचावून संमती दिली.
मंगळवारी दुपारी बारा वाजता कोंडिग्रे येथील श्रीवर्धन बायोटेक या ठिकाणी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल कुमार यादव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल राव नाईक निंबाळकर गोकुळ चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील मयूर चे चेअरमन संजय पाटील जि प सदस्य सर्वश्री अशोकराव माने राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषदेचे माधवराव धनवडे सावकार मादनाईक भरत बँकेचे चेअरमन विठ्ठल राव मोरे अशोकराव कोळेकर राम शिंदे दरगू गावडे महेंद्र बागी वैभव उगळे शेखर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.