ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बारा ज्योर्तिलिंगामध्ये विशेष स्थान असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडण्यात आले. (The doors of Kedarnath Dham opened for devotees) कोरोनाच्या दोन वर्षानंतर आजपासून हे मंदिर भाविकांसाठी खुलं झालं आहे. मंदिर उघडण्याच्या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह 10 हजार भाविक उपस्थित होते.
चार धाम यात्रा 3 मे रोजी सुरू झाली आहे. त्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी मंत्रोच्चारात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 10 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.
आजपासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. पण, उत्तराखंड सरकारने कोरोनामुळे चार धाम यात्रा 2022 साठी यात्रेकरूंच्या संख्येची दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. केदारनाथ मंदिरासाठी दैनंदिन मर्यादा 12,000, बद्रीनाथसाठी 15,000, तर गंगोत्री धामसाठी 47000 आणि यमुनोत्री धामसाठी दैनंदिन मर्यादा 4,000 ठेवण्यात आली आहे.