Tarun Bharat

सीमेपासून लढाऊ विमाने दूर ठेवा!

Advertisements

चीनला भारताने बजावले ः तैवान अन् ड्रगन यांच्यातील तणावाची पार्श्वभूमी

@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पूर्व लडाखमध्ये सीमेनजीक लढाऊ विमानांच्या उड्डाणावरून भारताने चीनला कठोर इशारा दिला आहे. चीनने स्वतःच्या लढाऊ विमानांना लडाखमधील सीमेपासून दूर ठेवावीत असे भारताने बजावले आहे. काही दिवसांपूर्वी चीनची लढाऊ विमाने भारताच्या सीमेच्या अत्यंत नजीक आली होती. तैवानसोबत चीनचा तणाव सुरू असताना भारताने हा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱयानंतर चीन संतप्त झाला आहे. याच्या विरोधात चीन तैवानच्या सीमेला लागून असलेल्या सागरी भागांमध्ये सैन्याभ्यास करत आहे.

लडाखमधील तणावाप्रकरणी भारत अन् चीन यांच्यात सैन्यस्तरीय बैठक पार पडली आहे. यात भारताने पूर्व लडाखमध्ये चीनच्या चिथावणीपूर्ण हालचालींबद्दल हरकत नोंदविली आहे. ही विशेष सैन्य बैठक मेजर जनरल यांच्या नेतृत्वात झाली आहे. यादरम्यान वायुदलाचे एअर कमोडोर देखील उपस्थित होते. याच पदाचा चिनी अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाला होता. तिबेटच्या सीमेनजीक उड्डाण करत असलेल्या लढाऊ विमानांवर भारत पाळत ठेवून असल्याचा आरोप चीनकडून या बैठकीत करण्यात आला आहे.

 भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाच्या एखाद्या अधिकाऱयाने सैन्यस्तरावरील चर्चेत भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बैठक चुंशूल मोल्डोमध्ये झाली आहे. विमानांनी स्वतःच्या सीमेत उड्डाण करावे, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि 10 किलोमीटरच्या सीबीएम लाइनचे पालन करावे असे भारताने चीनला बजावले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हवाई हालचालींवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. प्रत्यत्र नियंत्रण रेषेवर चीनकडून हालचाल दिसून आल्यास आम्ही देखील लढाऊ विमाने तैनात करत आहोत. भारतीय सैन्याने पूर्व लडाखमध्ये रडार तैनात करत आहे, यामुळे आकाशात होणाऱया कुठल्याही हालचालींवर नजर ठेवता येणार असल्याची माहिती वायुदल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी दिली आहे.

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अनेक फेऱयांमध्ये चर्चा पार पडली आहे. तर दुसरीकडे चीन मधल्या काळात चिथावणीपूर्ण कारवाया करत आहे. मागील 1-2 महिन्यांमध्ये चीनची लढाऊ विमाने भारतीय सीमेच्या अत्यंत नजीक आली होती.

चीनचा अनेक देशांसोबत तणाव

तैवानच्या मुद्दय़ावरून चीन आणि अमेरिका परस्परांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. तर चिनी सैन्याकडून तैवाननजीक मोठा युद्धाभ्यास करण्यात येत आहे. चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हवाई सुरक्षा सीमेत घुसखोरी करत आहेत. तसेच चीनकडून घातक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करण्यात येत आहे. चीनची काही क्षेपणास्त्रs जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोसळल्याने तो देश देखील सतर्क झाला आहे.

Related Stories

इन्स्टाग्रामवर लेडी कॉन्स्टेबलचा धमाका

Patil_p

राजस्थानात रुग्ण महिलेवर बलात्कार

Patil_p

मोदींच्या हत्येचा कट; NIA च्या मुंबई कार्यालयात निनावी ईमेल

datta jadhav

देशाला चौथी लस मिळण्याची अपेक्षा

Patil_p

शेतकऱ्यांचा पुन्हा ट्रक्टर मोर्चाचा इशारा

Patil_p

कोरोनाने दिवसभरात 300 हून अधिक मृत

Patil_p
error: Content is protected !!