नासाच्या अपूर्वा जाखडी यांचे प्रतिपादन : नाशिकमध्ये लोकमान्यतर्फे ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शन
प्रतिनिधी /नाशिक
देशाचा इतिहास हा अमूल्य ठेवा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. हाच इतिहास नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा ठरणार आहे. काळाची हीच गरज लोकमान्य सोसायटी’ने ओळखली, असे मत नासा स्पेसच्या एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी केले. त्या ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमफतमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडून या प्रदर्शनाचे आयोजन केले. नाशिक शहरातील पुणे रोडवर असलेल्या
‘लोकमान्य’च्या क्षेत्रीय कार्यालयातील मेरीगोल्ड या बँक्वेट हॉलमध्ये 26 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते 7 या वेळेत प्रदर्शन सुरू असेल. ते सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.
लोकमान्य सोसायटीकडून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. हीच परंपरा कायम ठेवत देशाचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेतला, असे विभागप्रमुख प्रकाश चितोडकर यांनी सांगितले. या प्रदर्शनामुळे अकोल्याच्या कै. जयंत सहस्त्रबुद्धे यांनी साकारलेला चित्रऊपी ठेवा नाशिककरांना पाहण्याची संधी मिळाली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील 404 ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे, त्यांचे कार्य अशी संपूर्ण माहिती या प्रदर्शनात बघता येणार आहे. स्वातंत्र्यसंग्रामात शेकडो सैनिकांनी आहुती दिली. इतिहासामध्ये यातील अनेकांची दखल घेतली गेली नाही. मात्र, त्यांचे योगदान मोठे आहे. अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती आणि त्यांची अत्यंत दुर्मीळ स्वऊपाची चित्रे पाहता येणार आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी राजू नाईक, बेळगाव यांनी दिली. तर समन्वयक हेमंत फडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी, सर्व शाखा अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. या प्रदर्शनाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन ‘लोकमान्य’कडून करण्यात आले आहे.