कपाटात निश्चित केली आहे जागा
जगात अनेक प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्या वेगवेगळय़ा समस्या असतात. काही जणांची वैद्यकीय स्थिती डॉक्टरांनाही अवाप् करून सोडत असते. अशाच एका अजब स्थितीत एक मुलगी जन्मली असून तिचे हृदय सामान्य स्थितीत नाही. तिच्यावर 200 शस्त्रक्रिया झाल्या असून यात हृदय आणि यकृत प्रत्यारोपण देखील सामील आहे.
जेसिका मॅनिंग नावाची 28 वर्षीय युवती वेगळय़ाच वैद्यकीय स्थितीसह जन्माला आली होती. ती स्वतःचे हृदय आणि यकृत प्लास्टिक बॅगेत पॅक करून कपाटात ठेवते. या युवतीचे आयुष्य यंत्रांच्या मदतीने सुरू असले तरीही ती लोकांना हृदयविकारावर मात करण्यासंबंधी प्रेरणा देत आहे.
28 वर्षीय जेसिका न्यूझीलंडमध्ये राहते आणि ती जन्मजात स्वरुपात हृदयाशी संबंधित विकाराने ग्रस्त आहे. तिचे हृदय जवळपास निम्मेच विकसित होते, त्यात छिद्र आणि लीक करणारे व्हॉल्व्ज होते. तिच्या तिसऱया वाढदिवसापर्यंत तिच्यावर दोन ओपन हार्ट सर्जरी झाल्या होत्या. ती काही वर्षेच जगू शकेल असे मानले जात होते. परंतु आता ती 28 वर्षांची झाली असून तिच्यावर 200 हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यात 5 ओपन हार्ट सर्जरी सामील आहेत. दोन पेसमेकर सर्जरी आणि एक इमर्जन्सी लंग सर्जरीसह वयाच्या 25 वर्षापर्यंत तिच्यावर हृदय आणि यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती. माझ्या छातीत एक यंत्र आहे आणि माझ्या हृदयाच्या जागी अन्य कुणाचे हृदय माझ्या शरीरात धडधडतेय हा विचारच अत्यंत अजब वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.
कपाटात ठेवते अवयव
जेसिका पूर्ण 53 दिवसांपर्यंत आयसीयूत राहिली, 14 दिवसांपर्यंत वॉर्ड आणि 21 दिवस रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये राहिल्यावर ती सामान्य जीवन जगू लागली. तिच्या शरीरावर शस्त्रक्रियेच्या अनेक खुणा आहेत, या खुणांबद्दल तिला गर्वच वाटतो. शस्त्रक्रियेनंतर तिचे हृदय आणि यकृत विद्यापीठात संशोधनासाठी घेण्यात आले होते. 10 महिन्यांनी हे अवयव परत मिळाल्यावर ती त्यांना घरात ठेवू लागली. या अवयवांना ती प्लास्टिक बॅगेत ठेवून कपाटात ठेवतआहे. स्वतःच्या टिकटॉक अकौंटद्वारे ती या अवयवांना दाखवून अवयव प्रत्यारोपणासंबंधी जागरुकता फैलावत आहे. तिच्या या हिमतीचे लाखो लोक कौतुक करत आहेत.