व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. त्यांना तिहार तुऊंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी 20 जून रोजी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. 21 जून रोजी ईडीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर 25 जून रोजी सुनावणी झाली. याप्रसंगी सत्र न्यायालयाने आमची बाजू नीट ऐकून घेतली नसल्याचा दावा केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने राऊस अॅन्व्हेन्यू न्यायालयाचा निर्णय रद्द करत न्यायालयाने ईडीला युक्तिवाद करण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती, असे स्पष्ट करत जामीन रद्द केला होता. केजरीवाल यांच्याविरोधात ईडी व्यतिरिक्त सीबीआयमध्येही खटला सुरू आहे. मद्य धोरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने 26 जून रोजी त्यांना अटक केली होती. 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता, परंतु हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले होते. यावरील सुनावणीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.