वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआयने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने केवळ एका आठवड्यासाठी कोठडी वाढवली. यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. केजरीवाल तिहार तुऊंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपली साखरेची पातळी कमी होत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. साखरेची पातळी स्थिर राहत नसल्यामुळे आपल्याला घरातून दुपारचे जेवण घेण्याची परवानगी मागितली आहे.
मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांच्यावर ईडी आणि सीबीआय असे दोन्ही खटले सुरू आहेत. ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. मात्र, या प्रकरणात त्यांना आधीच जामीन मिळाला आहे. सीबीआय प्रकरणात ते तुऊंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेविरोधात दाखल केलेली याचिका 5 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. तसेच जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले होते. मद्य धोरण प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने 26 जून रोजी केजरीवाल यांना अटक केली होती.