वार्ताहर /केपे
केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात येऊन वर्ष 2022-23 साठी परत एकदा अध्यक्षपदी रमेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी निवडलेली अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे-उपाध्यक्ष महेश च्यारी, सचिव योगेश अंजिखाने, उपसचिव नीलेश देसाई, खजिनदार औदुंबर काणेकर, सहखजिनदार राजेश नाईक, सदस्य कामिनी दलाल, वसंत म्हालधर, इस्माईल खान, वल्लभ शेटकर व शिवम नाईक. अध्यक्ष रमेश नाईक यांनी मागील वषी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले व अशाच प्रकारे सर्व सभासद एकत्रित राहून, एकमेकांना सहकार्य करून यावषी उत्सव साजरा करूया, असे सांगितले.