प्रतिनिधी /पणजी
येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे आयोजित ‘हिन्दी सृजनोत्सव 2022’ कार्यक्रमात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पदवी आणि पदव्यत्तर साहित्यिक स्पर्धेत केपे येथील शासकीय महाविद्यालय महाविजेता ठरली तर सेंटर झेवियर्स महाविद्यालय, म्हापसा व संत सोहिरोबानाथ अंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे ही महाविद्यालये उपविजेता ठरली.
येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या हिन्दी सृजनोत्सव 2022 निमित्त राज्यस्तरीयवरील पदवी आणि पदवीत्तर महाविद्यालन विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभक्तीगीत गायन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, द्विपात्री नाटय़ प्रस्तुती स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धेत मोठय़ाप्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संहभाग दाखविला होता.
देशभक्तिगीत गायन स्पर्धा – प्रथम पुरस्कार – सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा, द्वितीय पुरस्कार – गोवा विद्यापीठ, तृतिय पुरस्कार – संत सोहिरोबाबाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणे.
कविता वाचन स्पर्धा – प्रथम क्र. – सिद्धी शिरोडकर (विद्या प्रबोधिनी महाविद्याय, पर्वरी), दुसरा क्र. – प्रतिक खराटे (सेंट झेवियर महाविद्याय, म्हापसा), तृतिय क्र. – अंकुर कोसंबे (शासकीय महाविद्यालय, केपे)
वक्तृत्त्व स्पर्धा- प्रथम बक्षिस – नेहा गुडे (शासकीय महाविद्याय, केपे), द्वितीय बक्षिस – श्रद्धा शिरोडकर (स्वामी ब्रह्मानंद महाविद्याय, कुंडई), तृतिय बक्षिस – स्वाती मिश्रा (गोवा विद्यापीठ).
पोस्टर निर्मिती स्पर्धा – प्रथम बक्षिस – सृजन सावंत देसाई व करूवेश चौरासिया (शासकीय महाविद्यालय, केपे), तृतिय बक्षिस – अंबिगेल कायदादो व प्रकाश मसुती (धेंपे महाविद्याय, मिरामार), तृतिय बक्षिस – श्री दामोदर कॉलेज, मडगाव.
परीक्षकांची खास बक्षिसे नंदिनी च्यारी व दिशा साखळकर (सी. ई. एस महाविद्याय, कुंकळी्) व कार्मेल महाविद्यालय, नुवे.
निबंध लेखन स्पर्धा – प्रथम बक्षिस – मानसी प्रभू भटगांवकर (सेंट झेवियर महविद्यालय, म्हापसा), द्वितीय बक्षिसे – महिमा मोहनदलाल (संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्याय), तृतिय बक्षिस – ईषा वेळीप (शासकीय महाविद्यालय, केपे).
दोनपात्री नाटय़ छटा स्पर्धा – प्रथम क्र. – प्रणव गांवकर व नेहा उपाध्ये (विद्या प्रबोधिनी महाविद्यालवय पर्वरी), दुसरे बक्षिस – राहुल रामजी व रंजिता देसाई (संत सोहिरोबानाथ अंबिये महाद्यिलय, पेडणे), तिसरे बक्षिस – केदांगी पार्सेकर व सोनम गौडेकर (सेंट झेवियर महाविद्याय म्हापसा) या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.
या सर्व स्पर्धांचे परिक्षण गोरख मांद्रेकर व साईश देशपांडे (देशभक्तीगीत स्पर्धा), अभय सुराणा व पुनम नाईक (वक्तृत्त्व स्पर्धा), स्मिता धर्शेकर व कांचन बोरकर (कविता वाचन स्पर्धा), ज्योतीकुलकर्णी व सुमन सामंत (निबंध वाचन स्पर्धा), संजय हरमलकर व सिद्धार्थ गायतोंडे (पोस्टर निर्मिती स्पर्धा), शांताराम प्रभू व ज्ञानेश्वर पार्सेकर (दोन पात्री नाटय़ स्पर्धा) यांनी केले होते.
तत्पुर्वी सकाळी या हिंन्दी सृजनोत्सव 2022 या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सुधा अरोडा यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या अध्यक्षा श्रीमती कृष्णी वाळके, ईस्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब, गोवा विद्यापीठाच्या डॉ. आशा गेहलोट उपस्थित होत्या तर समारोप कार्यक्रमाला गोवा विद्यापीठाच्या हिन्दी विभागाच्या अध्यक्षा प्रा. वृषाली मांद्रेकर उपस्थिती होत्या. त्यांच्याच हस्ते वरील स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अर्चना गायतोंडे व मेगदालिन डिसोझा यांनी केले तर शेवटी अशोक परब यांनी आभार मानले.