ऑनलाईन टीम/तरुण भारत
एखाद्या व्यक्तीच नशीब बदलायला वेळ लागत नाही. ‘भगवान जब देता है छप्पर फाड के देता है’, ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरली आहे, केरळमध्ये एका रिक्षाचालकाचे नशीब चांगलेच फळफळले आहे. शनिवारी ५०० रुपये खर्चून तो रविवारी तब्बल २५ कोटी रुपयांचा मालक झाला आहे. ओणम बंपर प्राइस केरल लॉटरी त्याने जिंकली आहे.
केरळमधील एका तीस वर्षीय रिक्षा चालकाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे. शनिवारी या रिक्षा चालकाने लॉटरीचे तिकीट काढलं होते. रविवारी या रिक्षाचालकाला २५ कोटी रुपयांची बंपर लॉटरी लागली आहे. अनुप असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तो आधी एका हॉटेलमध्ये शेफ होता. तो दर शनिवारी रात्री भगवती एजन्सी येथून लॉटरी विकत घ्यायचा. केरळ लॉटरीच्यानुसार अनूपने घेतलेल्या तिकिटाचा क्रमांक हा टीजे ७५०६००५ हा होता. याच क्रमांकाने अनुपला तब्बल २५ कोटी रुपये जिंकून दिले. यावरील टॅक्स कापुनही त्याला तब्बल १५ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहे.
अनूप बी श्रीवरहम येथील रहिवासी असून, तो एका हॉटेलमध्ये कामास होता. मात्र, कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी अनूपने रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. अनूपला मलेशियातील एका हॉटेलमध्ये काम करण्यास जायचे होते. त्यासाठी त्याला पुढील आठवड्यात व्हिसा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसेच, त्यासाठी त्याने कर्जही काढले होते. मात्र, ओणमनंतर रविवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालात TJ750605 क्रमांकाला २५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे घोषित करण्यात आले. ती लॉटरी अनूपने खरेदी केली होती.