Tarun Bharat

माकडांसाठी होते मेजवानीचे आयोजन

Advertisements

थायलंडमधील अनोखा सण ठरतो कारणीभूत

जगात प्रत्येक धर्म आणि समुदायाची स्वतःची अशी मान्यता असते. लोकांनी पिढय़ानपिढय़ा स्वतःच्या अनोखे परंपरेचे पालन करणे सुरूच ठेवले आहे. अनेकदा या परंपरा धर्माशी निगडित असतात. तर काही वेळा या परंपरा लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक ठरतात. अशीच एक परंपरा थायलंडमध्ये पालन केली जाते. तेथे मंकी बुफे फेस्टिव्हलचे आयोजन होते. थायलंडमध्ये या सणात माकडांसाठी बुफे म्हणजेच खाद्याची मेजवानी आयोजित केली जाते.

बँकॉकपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर लोपबुरी नावाचे शहर आहे. या थाई शहरात दरवर्षी एक सण साजरा केला जातो आणि याला ‘मंकी बुफे फेस्टिव्हल’ म्हटले जाते. या सणासाठी एखाद्या मिरवणुकीप्रमाणे तयारी केली जाते. बुफेत खाण्याची व्यवस्था करण्यात येते, सजावट करण्यात येते, परंतु हे सर्व माणसांसाठी नव्हे तर माकडांसाठी केलेले असते.

माकडांसाठीचा सण

सणासाठी व्यवस्था करणारे लोक माकडांसाठी ताजी फळे, सॅलड आणि थाई मिठाई उपलब्ध करतात. तसेच याला मोठय़ा उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येते. या सणाची सुरुवात येथील एका स्थानिक व्यापाऱयाने केली होती असे लोकांचे मानणे आहे. लोपबुरीमध्ये माकडांची संख्या अधिक असल्यानेच  येथे पर्यटक मोठय़ा संख्येत येत असल्याचे या व्यापाऱयाचे मानणे हेते. या माकडांमुळे पर्यटकांची संख्या वाढत गेली आणि व्यापाऱयांचा व्यवसायही वाढत गेला. अशा स्थितीत या व्यापाऱयाने माकडांना पार्टी देत ती या शहरातच रहावीत याची खबरदारी घेतली.

माकडांचा धुमाकूळ

कोरोना काळात थायलंडमधील हे शहर माकडांमुळे त्रस्त होते. जगभरातून येणाऱया पर्यटकांनी खाद्यपदार्थ दिल्याने या माकडांचे पोट भरत होते. परंतु कोरोना महामारीच्या काळात पर्यटकांचे येणे बंद झाले होते. अशा स्थितीत माकडांनी स्थानिकांसमोर अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. ही माकडं दुकानातू सामग्री चोरू लागली. तर अन्नासाठी त्यांच्यात परस्परांमध्ये भांडणं होत होती. या माकडांमध्ये माणसांबद्दलची भीती दीर्घकालीन सहवासामुळे संपुष्टात आली आहे.

Related Stories

आकाशातून उंदरांवर पाडविले जाणार विष

Patil_p

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात ५०० किलो फळ व भाज्यांची आरास

prashant_c

ताजमहालचे दर्शन अधिकच महाग

Patil_p

इंग्रजांच्या गोळ्या झेलणारी शेवटची छाती अण्णा सापते

datta jadhav

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

prashant_c

पालकांपासून वेगळे रहा, 20 हजार मिळवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!