Tarun Bharat

केरये विष्णू सोमनाथ देवस्थानचा आजपासून नूतन मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा

वार्ताहर /उसगांव

केरये खांडेपार येथील श्री विष्णू सोमनाथ देवस्थानचा नूतन मूर्ती प्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळा शनिवार दि. 23 ते सोमवार दि. 25 दरम्यान विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.

काल शुक्रवार दि. 22 रोजी सायं. 4 वा. श्री विष्णू सोमनाथाच्या नूतन मूर्ती, शिखर कलश, नंदीराज यांचे उसगांव येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकातील कलाकारांतर्फे मिरवणुकीसह श्री शांतादुर्गा मंदिर, देऊळवाडा खांडेपार येथून श्री विष्णू सोमनाथच्या मंदिरात आगमन झाले. दि. 23 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी, सायं. 7 वा. राक्षोघ्न होम. दि. 24 रोजी संपूर्ण दिवस धार्मिक विधी, सायं. 7.30 वा. ऋग्वेदा देसाई, ऋषिकेश ढवळीकर, आर्या बोरकर, पृथा गांवकर व सहकलाकार साईशा मोने, शांभवी मराठे, सानिका मोने व निधी खेडेकर यांचा ‘स्वरविहार’ हा संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

दि. 25 रोजी सकाळी 8 वा. स्थल प्राकारशुद्धी, स्थापित देवता पूजन, तत्त्व होम, परिवार देवता हवन, मधुपर्क पूजा, 10.24 वा. शिखर कलश प्रतिष्ठापना, 11.16 वा. मूर्ती प्रतिष्ठापना, तत्त्वन्यास, महापूजा, प्राकारबली, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णाहुती, महाआरती, सार्वजनिक गाऱहाणे, ब्राह्मण संभावना, आशीर्वाद व महाप्रसाद होईल. रात्री 10 वा. श्री नागेश महारुद्र नाटय़संस्था, नागेशीनिर्मित व प्रशांत सतरकर प्रस्तुत ‘भाग्यचक्र’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

Related Stories

मडगाव, पर्वरी केंद्रांतील रुग्णवाढ चिंताजनक

Amit Kulkarni

माशेल येथे उघडय़ावर सांडपाणी सोडण्य़ाचे प्रकार

Amit Kulkarni

चोर्ला घाटात संरक्षक कठडे कोसळले

Omkar B

शेवटच्या मिनिटाला विलियम्सच्या गोलने एटीकेचा चेन्नईनवर विजय

Amit Kulkarni

हत्तीपावल कचरा प्रक्रिया प्रकल्प इतरत्र हलविणार

Amit Kulkarni

विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठांना टपाल मतदानाची सोय – रॉड्रिग्स

Patil_p