दोडामार्ग / वार्ताहर–
आमदार दीपक केसरकर व आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोडामार्ग शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी व दीपक केसरकर समर्थकांनी आज येथील गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी व जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला. श्री. केसरकर व श्री. चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे वृत्त प्रसारित होताच सर्व पदाधिकारी येथील गांधी चौकात दोहोंच्या अभिनंदनाच्या घोषणा दिल्या.यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर,व इतर उपस्थित होते.