प्रतिनिधी /बेळगाव
तरुण भारत वृत्तपत्राशी प्रारंभीपासूनच जोडले गेलेले आणि आपल्या खास शैलीव्दारे ओरडून महत्त्वाच्या बातम्या सांगत तरुण भारतची विक्री करणारे ज्ये÷ व जुन्या काळातील वृत्तपत्र विपेते केशव पिसे यांचा तरुण भारत परिवारातर्फे बुधवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
तरुण भारत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते पिसे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच तरुण भारतला नेहमीच सहकार्य करणारे राहुल बेदे व हनुमान वॉच कंपनीचे संचालक संजय हेब्बाळकर यांचाही सत्कार करण्यात आला. संजय अनुपस्थित असल्याने त्यांच्या पत्नी राजश्री हेब्बाळकर यांनी हा सत्कार स्वीकारला.
यावेळी पिसे यांनी आपण तरुण भारत कशा पध्दतीने वाचकांपर्यंत पोहोचविला याची माहिती दिली. तसेच तरुण भारतच्या आजवरच्या प्रगतीची झेप पाहून समाधान व्यक्त केले. राहुल आणि राजश्री यांनी सुध्दा सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जयवंत मंत्री यांनी, कोणत्याही बातमीचे शिर्षक आकर्षक असायला हवे. त्यामुळे वाचकांचे त्याबातमीकडे लक्ष वेधले जाते, असे सांगून पिसे यांनी या शिर्षकांचाच म्हणजे हेडलाईन्सचा अधिकाधिक उपयोग करुन घेत तरुण भारत लोकांपर्यंत पोहोचविला, असे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक करुन मनीषा सुभेदार यांनी सुत्रसंचालन केले.