ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय. आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. आज सकाळीच ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात पोलिसांनी केतकी चितळे हिच्यावर गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर पोलीस केतकी चितळे हिला ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.
दरम्यान केतकी चितळेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे. तर दुसरी केतकी चितळेच्या पोस्टनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील पत्रक जारी करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
केतकी चितळेविरोधात आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार दाखल केलीये. केतकी चितळे हीने फेसबूकवर केेेलेल्या पोस्टनंतर तीच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.