Tarun Bharat

केव्हिन ओब्रायन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Advertisements

वृत्तसंस्था/ डब्लिन (आयर्लंड)

आयर्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू केव्हिन ओब्रायनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. 2006 साली ओब्रायनने आयर्लंड संघामध्ये पदार्पण केले होते.

तब्बल दोन दशकांच्या कालावधीत आयर्लंड संघातील केव्हिन ओब्रायन हा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला गेला. केव्हिन ओब्रायनने 3 कसोटी, 153 वनडे आणि 110 टी-20 सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले. ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर केव्हिन ओब्रायनने निवृत्त होण्याचे ठरविले होते. पण या स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या आयर्लंडच्या संघामध्ये केव्हिन ओब्रायनला वगळण्यात आल्याने त्याने निवृत्तीची घोषणा केली. 16 वर्षांच्या आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याने 389 सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले. त्याने एकूण 5850 धावा व 172 बळी मिळविले. नजीकच्या काळात आपण स्वतःची क्रिकेट कोचिंग अकादमी सुरू करणार असल्याचे ओब्रायनने म्हटले आहे.

Related Stories

रशियाचा आंद्रे रूबलेव्ह अजिंक्य

Patil_p

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा 20 जणांचा संघ

Patil_p

मुंबई सिटीचा ईस्ट बंगालवर दिमाखदार विजय

Patil_p

जर्मनीच्या केर्बरला हरवून फर्नांडिझ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सेरेना, मेदवेदेव्ह, किर्गीओस, गॉफ तिसऱया फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!