वृत्तसंस्था /गुडालजेरा
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या गुडालजारा महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या कोको गॉफने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविताना इटलीच्या ट्रिव्हेसनचा पराभव केला.
या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात अझारेंकाने मॅडिसन किजचा 6-4, 6-7 (4-7), 6-1 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेच्या
गॉफने ट्रिव्हेसनचा 6-0, 6-3 असा फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. अझारेंका आणि गॉफ यांच्यात उपांत्यपूर्व लढत होईल. जेसिका पेगुलाने बियान्का अँडीस्क्मयूचा 6-4, 6-4 तसेच स्टीफेन्सने फ्रान्सच्या गार्सियाचा 7-6 (8-6), 7-5 असा पराभव केला.
करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. व्हेरोनिका कुडेमेटोव्हाने लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोचा 6-4, 6-4, झेकच्या बोझकोव्हाने सॅमसोनोव्हाचा 0-6, 7-5, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.