Tarun Bharat

केएफसी बकेट पॅन्व्हसने गाठला 600 रेस्टॉरंटचा पल्ला

प्रतिनिधी /पणजी

देशभरातील ग्राहकांना केएफसी उत्पादनांच्या विशिष्?ट चवीचा अनुभव देतानाच विस्ताराचा मार्ग अधिक प्रशस्त करत केएफसी इंडियाने ’बकेट पॅन्व्हास’ या  मोहिमेद्वारे 600 रेस्टॉरंट्सचा मोठा पल्ला गाठला आहे.

या मोहिमेने देशभरातील उदयोन्मुख कलाकारांना एकत्र आणले आणि ब्रँण्डची उपस्थिती असलेल्या प्रत्येक शहरासाठी एक खास बकेट डिझाइन नेमून केएफसी बकेटला पॅन्व्हासचे रूप दिले. कला, स्थापत्य आणि वेगवेगळय़ा शहरांशी निगडित सांस्कृतिक घटकांच्या प्रेरणेतून तयार करण्यात आलेल्या या 150 लिमिटेड एडिशन बकेट डिझाइन्स केएफसीच्या सर्व रेस्टॉरंट्समध्ये ठेवण्यात आले आहेत.

आता केएफसीचे चाहते जवळच्या केएफसी रेस्टॉरंटला भेट देतील तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या शहराच्या वैशिष्टय़पूर्ण पाककला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कलाकार आणि त्यांच्या प्रेरणास्त्राsतांबद्दल केएफसीच्या वेबसाइटवर जाणून घेता येईल. याच वेबसाइटवर विविध शहरांच्या बकेट डिझाइन्?सही पाहायला मिळणार आहेत.

या कलाकृतींबद्दल बोलताना केएफसी इंडियाचे चीफ मार्केटिंग अधिकारी मोक्ष चोप्रा यांनी, ’या उपक्रमातून तयार झालेल्या कलाकृती पाहून आम्ही थक्क झालो आहोत आणि अशा विलक्षण नवप्रतिभेला लोकांसमोर आणण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य मानतो’, असे सांगितले.

Related Stories

दिशाभूल करण्याकरिता काँग्रेसने नाहक आरोप करू नयेत

Patil_p

वाळपई आठवडा बाजार बेगमीच्या वस्तूंनी फुलला

Amit Kulkarni

यंदा कलात्मक माटोळी गणपती देखावे दुर्लभ, पुढच्या वर्षी नक्की

Omkar B

बाराजण क्लबची भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा आजपासून पालयेत

Amit Kulkarni

फोंडा येथे शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे ख्रिसमस साजरा

Amit Kulkarni

धार्मिक स्थळ कायदा रद्द होण्यासाठी दबाव वाढवा

Amit Kulkarni