ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबसोबत आता हिमाचल प्रदेशातही खलिस्थानची मागणी होताना दिसत आहे. रविवारी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा भवनाच्या (himachal pradesh assembly building) गेटवर खलिस्थानी झेंडे (Khalistan Flags) लावण्यात आले आहेत. तसेच भिंतींवर खलिस्तानी समर्थांच्या घोषणाही लिहलेल्या आढळल्या आहेत. तर हा सर्व प्रकार पंजाबमधून आलेल्या काही पर्यटकांनी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हिमाचल पोलिसांनी रविवारी रात्रीपासून राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. (Himachal police closed state borders)
हिमाचल विधानसभा भवनाच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावल्यानं आता राज्य सरकार अलर्टवर आहे. हिमाचल पोलिसांनी रविवारी रात्रीपासून राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची तपासणी केली जात आहे. विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंड्याच्या प्रकरणी हिमाचल प्रदेश पोलिसांनी (himachal pradesh police) एसआयटीची (SIT) स्थापना केली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे आढळून आले. हे झेंडे विधानसभेच्या भिंतीला आणि मुख्य गेटला बांधलेले आढळले. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, ही घटना रात्री उशिरा किंवा रविवारी पहाटे घडली असावी. एसपी कुशल शर्मा यांनी सांगितल्यानुसार, सध्या विधानसभेच्या गेटवरुन हे खलिस्तानी झेंडे हटवले आहेत. पंजाबमधून आलेल्या काही पर्यटकांचे हे कृत्य असू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालं असून हिमाचल पोलिसांनी राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT ची स्थापना केली आहे.