Tarun Bharat

खानापूर दुर्गामाता दौडचे विविध ठिकाणी स्वागत

Advertisements

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सुरू असलेल्या दुर्गामाता दौडच्या आठव्या दिवशी पहाटे नगरसेवक विनायक पाटील व सागर पाटकर यांच्या हस्ते शिवपुतळय़ाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दौडला प्रारंभ झाला. दौडीत मोठय़ा संख्येने युवा, युवती व नागरिक सहभागी झाले हेते.

बुरुड गल्लीतून लक्ष्मीनगर येथे आल्यानंतर दौडचे लक्ष्मीनगरवासियांनी स्वागत केले. येथील हरि मंदिरात आरती करून दौडचे न्यू नाईक गल्लीत आगमन झाले. तसेच कोल्हापूर महालक्ष्मीची भव्य मूर्ती तयार करण्यात आली. या ठिकाणी ध्वजाची आरती करून दौडचे स्वागत केले. यानंतर दौड केंचापूर गल्लीतील गणेश मंदिरात आली. त्यानंतर कडोलकर गल्लीतील बसवाण्णा मंदिरात भव्य स्वागत करण्यात आले. समादेवी गल्लीतील हिरेमठ यांच्या शिव मंदिरात रेवणसिद्धय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली दौडचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर शिव मंदिरात आरती व पूजन झाल्यावर समादेवी मंदिरात दौड आली. या ठिकाणी वैश्यवाणी समाजबांधवांनी दौडचे स्वागत केले. तेथून दौड बाजारपेठेतील बसवेश्वर मंदिरात आल्यावर आरती झाल्यानंतर ध्येय मंत्राने दौडची समाप्ती करण्यात आली. 

दौडचा उद्याचा मार्ग

बुधवार दि. 5 रोजी शिवस्मारक, निंगापूर गल्ली, श्री लक्ष्मी मंदिर, देसाई गल्ली, श्री विठ्ठल मंदिर, बेंदे खुट्ट, चिरमुरकर गल्ली, श्री ज्ञानेश्वर मंदिराकडे समाप्ती होणार आहे.

Related Stories

खानापूर हायटेक बसस्थानक बांधकामाला सुरुवात

Amit Kulkarni

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 रोजी बेळगावात

Patil_p

मृतदेहापासून संसर्गबाधेचा धोका नाही !

Patil_p

जाहिरात कंत्राटदारांना 11 लाखांचा जीएसटी

Amit Kulkarni

कलमठ रोडवर वाहतुकीची कोंडी

Patil_p

दरोडेखोर निघाले वीट भट्टीतील कामगार

Amit Kulkarni
error: Content is protected !!