अनेक ठिकाणी फरशी तुटल्याने पुराचा धोका : नियोजनासाठी लघुपाटबंधारे-नगरपंचायत उदासीन : परिसरातील समाजसेवकांचे सहकार्य गरजेचे
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयात गेल्या दोन वर्षात झालेल्या जोराच्या पावसामुळे व मलप्रभा नदीला आलेल्या महापुरामुळे खानापूर शहराचे वैभव असलेल्या मलप्रभा नदीघाटाची दुरवस्था झाली आहे. नदीघाटावरील बऱयाच फरशा निकामी झाल्याने घाट धोक्मयात असून येत्या पावसाळय़ापूर्वी मलप्रभा नदीघाटाची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.
खानापूर तालुक्मयाची जीवनवाहिनी असलेल्या मलप्रभा नदीचे पाणी आता उन्हाळय़ात कमी झाले आहे. मान्सून उंबरठय़ावर आल्याने मागील आठवडय़ात या नदीकाठावरील पाणी अडज्वण्याच्या बंधाऱयात घालण्यात आलेल्या फळय़ा काढण्यात आल्या. त्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्याने तळ गाठला आहे. नदीचे पाणी कमी झाल्यानंतर मलप्रभा नदीघाटावरील दगडी बांधकाम व फरशीकाम निकामी झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय घाट परिसरात दुर्गंधी व कचरा साचल्याने स्वच्छता करणे गरजेचे आहे. महादेव मंदिर तसेच इस्कॉन मंदिरच्या बाजूने असलेल्या घाटावर बऱयाच ठिकाणी निकामी झालेल्या फरशा पुन्हा बसविणे गरजेचे आहे. रुमेवाडी गावाकडील घाटावर पावसाच्या पाण्याबरोबर माती येऊन साचल्याने ही माती काढून घाट स्वच्छ करणे गरजेचे आहे.
गेल्या दोन वर्षात मलप्रभा नदीघाटासाठी कोणतेही विकासाचे काम हाती घेण्यात आले नाही. यासाठी शासनाच्या विशेष निधीअंतर्गत तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून विशेष निधी आला. पण त्याचे नियोजन करण्यासाठी लघुपाटबंधारे अथवा नगरपंचायतीने कोणतीच पावले उचलली नाहीत. गेल्या दोन वर्षात आलेल्या महापुरामुळे घाटाच्या तुटलेल्या फरशा अथवा बांधकाम हाती घेण्यासाठी आर्थिक साहाय्यतेची गरज आहे. याकरिता खानापूर व परिसरातील समाजसेवकांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. कारण मलप्रभा नदीच्या तुटलेल्या भागाची तात्काळ दुरुस्ती नाही झाली तर या वषीच्या पावसाळय़ात पुन्हा घाटाची अधिकच दुरवस्था होणार आहे.
नदीघाट दुरुस्तीसाठी मदतीचे आवाहन
घाटाच्या दुरुस्तीसाठी खानापूर शहर परिसरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे मलप्रभा नदीघाटाच्या दुरुस्तीसाठी ज्यांना आर्थिक मदत अथवा श्रमदान करायचे आहे, त्यांनी मलप्रभा नदीघाट विकास समितीचे सदस्य सुभाष देशपांडे मो. 9448921274 तसेच वसंत देसाई 9448967421 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.