अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
प्रतिनिधी /खानापूर
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची उदाहरणे दिली जातात. मात्र प्रत्यक्ष आमच्या तालुक्मयात विठ्ठल हलगेकर हेच जिवंत उदाहरण आहे. स्वत:च्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असताना परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका संस्थेत शिक्षकाची बिनपगारी नोकरी करत गावातील सामान्य लोकांना बरोबर घेऊन महालक्ष्मी ग्रुपची स्थापना केली. दोन ऊपयाचा फंड सुरू केला. त्याचेच मोठ्या सहकार संस्थेत रुपांतर झाले आहे. आज सहकारात व शिक्षण क्षेत्रात जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. विठ्ठलराव हलगेकर यांच्या रूपाने तालुक्मयाला एक कर्तृत्ववान व्यक्ती मिळालेली आहे. आज भाजपसारख्या पक्षात सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा कार्यकर्ता असणं हे तालुक्मयासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. स्वत:च्या प्रकृतीचा विचार न करता अहोरात्र लोकांसाठी झटणे हेच उद्दीष्ट ठेवून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खानापूर तालुका भाजपच्या सदिच्छा कायम आहेत, असे संजय कुबल म्हणाले.
महालक्ष्मी तोपिनकट्टी ग्रुपचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी तोपिनकट्टी या मूळगावी ग्रामदेवतांना अभिषेक, पूजा करण्यात आली. देवदर्शनानंतर गावातील सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या. तोपिनकट्टीत वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यानंतर खानापूर येथील भाजप कार्यालयात खानापूर तालुका भाजपच्यावतीने विठ्ठलराव हलगेकर यांचा तालुका भाजपच्यावतीने वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी किरण यळ्ळूरकर म्हणाले, सर्वसामान्यांचा तळमळीने विचार करणारे विठ्ठलराव हलगेकर यांचे कर्तृत्व खरोखर देदिप्यमान आहे. सतत 25 वर्षे कोणत्याही मदतीशिवाय सामान्य जनतेच्या हिताचा विचार करत वेगवेगळी समाजकामे करत क्रांती घडवली आहे. तालुक्मयात महिला, युवक, शेतकरी तसेच सर्वसामान्यांसाठी सहकार व शिक्षण क्षेत्रातून रोजगार निर्माण करून सामान्य कुटुंबाची अर्थव्यवस्था सुधारलेली आहे. हलगेकर यांच्या योगदानामुळे निश्चितच तालुक्मयाला एक वेगळी दिशा, वेगळे रूप मिळालेले आहे. यावेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची त्यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली.
शांतिनिकेतन विद्यालयात भव्य सत्कार
शांतिनिकेतन विद्यालयात महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने त्यांचा भव्य असा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विठ्ठलराव हलगेकर म्हणाले, मी स्वत: गरीब कुटुंबात जन्मलेलो असल्याने मला गरिबीची झळ काय असते हे मी जवळून अनुभवलेली आहे. मला सर्वसामान्यांच्या हिताची कळकळ होती. आणि त्या दृष्टीने मी सतत विचार करत होतो आणि माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आज या संस्थेचे हे वटवृक्षात रूपांतर झालेले पाहून खरोखरच आनंद होत आहे. महालक्ष्मीच्या ग्रुपच्या माध्यमातून जी समाजसेवा आपण करत आहोत ती यापुढेही सतत करत राहू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटत राहू. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली. येथील सरकारी ऊग्णालयातील ऊग्णांना फळे वाटण्यात आली.