Tarun Bharat

खानापूर तालुका म. ए. समितीच्या रास्तारोकोला यश

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर तालुका म. ए. समितीने रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आज सकाळी 11 वा. रूमेवाडी क्रॉस येथे केलेल्या रास्तारोको आंदोलनाला यश आले. तहसीलदार प्रवीण जैन, पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्यासह रस्ता प्राधिकरणचे पाटील यांनी समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांनी वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून येत्या पाच दिवसात रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डÎातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.  संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारक, प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार सकाळी 11 वाजता रुमेवाडी क्रॉस येथे रस्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी खड्डÎात वृक्षारोपण करून संबंधित प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाला तहसीलदार प्रवीण जैन सुरेश शिंदे व रस्ता प्राधिकरणचे पाटील यांनी भेट देऊन समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱयांनी दिलेल्या आश्वासनानंतर  हे आंदोलन मागे तूर्त स्थगित करण्यात आले.

Related Stories

राज्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दर 6.68 टक्क्यांवर

Amit Kulkarni

दिवाळीसाठीच्या रंगांचा व्यापार बेरंगच

Amit Kulkarni

शहरवासियांचे लक्ष मनपा वॉर्ड पुनर्रचनेकडे

Omkar B

जीवदान देणाऱया लोकोपायलटचा सन्मान

Amit Kulkarni

खून करणाऱया ‘त्या’ दोघांना न्यायालयीन कोठडी

Patil_p

सदलगा येथील रिंगरोड धोकादायक

Patil_p