Tarun Bharat

खांडोळा श्री दाड मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा आजपासून

Advertisements

वार्ताहर /माशेल

खांडोळा माशेल येथील श्री भगवती हळदोणकरीण देवस्थानच्या श्री दाड देवाचा नूतन मूर्ती प्रतिष्ठापना, शिखर कलश स्थापन व श्री आकारी पुरुष देवाच्या पंचधातू स्थिरस्थापना सोहळा 6 व 7 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शनिवार 6 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरत्या व महाप्रसाद होईल. रविवार 7 रोजी सकाळी धार्मिक विधी, नूतन शिखर कलश स्थापना, श्री दाड नूतन मूर्ती स्थापना व आकारी पुरुष देवता स्थिर स्थापना त्यानंतर आरत्या, सामुहिक गाऱहाणे व महाप्रसाद होईल. श्री दाड मूर्ती प्रतिष्ठापनेचे यजमानपद सौ. व श्री. रामकृष्ण उत्तम च्यारी (पोंबुर्फा), श्री दाड देवता शिखर कलश स्थापनेचे यजमानपद सौ. व श्री. रघुवीर दत्ताराम च्यारी (नेरुल) व श्री आकारी पुरुष देवता स्थिर प्रतिष्ठापना सोहळय़ाचे यजमानपद कामत हळदणकर कुटुंबीयांशी संबंधित सौ . व श्री. अनंत विठ्ठल कामत हळदणकर (रायबंदर) हे भूषविणार आहेत. सर्व कुळावी, मुळावी, महाजन व भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे श्री भगवती हळदणकरीण देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

म्हापसा भोवताल परिसरातील दुचाक्या चोरणाऱया अट्टल चोरटय़ास अटक

Patil_p

देवेंद्र फडणवीस, प्रतापसिंह राणे भेटीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Amit Kulkarni

नळाच्या पाण्यात प्लास्टिकचे सुक्ष्म कण

Amit Kulkarni

विविध क्षेत्रातील दिवंगतांना वाहिली श्रद्धांजली

Amit Kulkarni

बेकायदा बांधकामप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

Omkar B

कोरोनामुळे राज्यात एकाच दिवसात तिघांचे बळी

Patil_p
error: Content is protected !!