Tarun Bharat

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे निधन

गुहागर/प्रतिनिधी

गुहागर शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे हृदयविकाराने गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजता निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते.

गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयामध्ये 1992 पासून ते प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले. पदवीधर अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. 2018 पासून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. बुधवारी मोडकाघर येथील त्यांच्या राहत्या घरी रात्री बाराच्या दरम्यान त्यांना त्रास सुरू झाला. गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर अधिक उपचाराकरिता त्यांना गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानतर त्यांचा मृतदेह सांगली येथील विटा या गावी त्यांच्या घरी नेण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

दापोलीत गरोदर महिलेसह तिघांना कोरोनाची लागण

Patil_p

नियमांतील अटींमुळे जलतरण तलाव अद्याप बंदच

Patil_p

लांजा तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस

Archana Banage

रत्नागिरी : कोकणातील शेतकऱ्यांची चेष्टा खपवून घेणार नाही

Archana Banage

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळून जेसीबी चालकाचा मृत्यू

Archana Banage

जिह्याच्या जलधी क्षेत्रामध्ये परप्रांतीय नौका पकडली

Amit Kulkarni