वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मिरातील बारामुल्ला जिल्हय़ातील गुलमर्गमधील स्कि रिसॉर्ट येथे तिसरी खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धा पुढील महिन्यात आयोजित करण्यात आली असल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले.
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेची तिसरी आवृत्ती 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होण्यासाठी देशभरातील 2000 हून अधिक क्रीडापटू गुलमर्गमध्ये दाखल होणार आहेत. स्नो शू रेस, आईस स्केटिंग, आईस हॉकी, स्किईंग, नॉर्डिक स्कि, स्नोबोर्डिंग, स्कि माऊंटेनियरिंग, आईस स्टॉक हे क्रीडा प्रकार यातील प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. या स्पर्धेने जम्मू-काश्मिरमध्ये फक्त खेळांचा प्रसार होणार नसून स्थानिक व विदेशी पर्यटकांनाही ही स्पर्धा आकर्षित करणारी ठरेल, असे जेके टूरिझमचे सचिव सरमद हाफीज म्हणाले.