Tarun Bharat

गुजरात जायंट्ससाठी खिस गेलची निवड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विंडीजचा टी-20 स्पेशालिस्ट ख्रिस गेलची लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये अदानी स्पोर्ट्सलाईनच्या मालकीच्या गुजरात जायंट्सने निवड केली आहे. याच संघातून वीरेंद्र सेहवागही खेळणार आहे.

ही स्पर्धा 16 सप्टेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर सुरू होणार आहे. एलएलसीच्या नियमानुसार प्रत्येक प्रँचायझीला अंतिम संघ घोषित करण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी आहे. जायंट्स प्रँचायझेने 5.52 कोटी रुपये खर्च केले असून अंतिम संघ निश्चित करण्यासाठी त्यांच्याकडे आणखी सुमारे 2.5 कोटी रुपये शिल्लक आहेत. या उरलेल्या रकमेतून त्यानी गेलला आपल्या संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात बोलणी सुरू असून गेल अदानी स्पोर्ट्सलाईकडून खेळताना दिसेल, अशी मी आशा करतो, असे एलएलसीचे सीईओ व सहसंस्थापक रमन रहेजा यांनी सांगितले. गेलच्या संघातून विंडीजचा लेंडल सिमॉन्स, पार्थिव पटेलही खेळणार आहेत. लंकेचा गूढ स्पिनर अजंथा मेंडिस, न्यूझीलंडचा माजी कर्णधार व डावखुरा स्पिनर डॅनियल व्हेटोरी स्पिन विभागाचे नेतृत्व करेल तर मिशेल मॅक्लानाघन वेगवान गोलंदाजीची आघाडी सांभाळेल.

गुजरात जायंट्स संघ ः सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल, गेल, चिगुंबुरा, ट्रेम्लेट, रिचर्ड लेव्ही, ग्रीम स्वान, जोगिंदर शर्मा, मॅक्लानाघन, सिमॉन्स, मनविंदर बिस्ला, अजंथा मेंडिस.

Related Stories

रोहित शर्माच्या सहभागाविषयी सांशकता

Patil_p

अंधांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत अजिंक्य

Patil_p

कोण ठरणार युसेन बोल्टचा उत्तराधिकारी?

Patil_p

नागलचा पहिल्याच सामन्यात पराभव

Patil_p

पश्चिम विभाग दुलीप करंडकाचा मानकरी

Patil_p

पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉनवे सहावा फलंदाज

Amit Kulkarni