Tarun Bharat

8 महिन्यांच्या मुलीसह 4 भारतीयांचे अपहरण

Advertisements

अमेरिकेतील धक्कादायक घटना ः पोलिसांकडून तपास सुरू

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील मर्सिड काउंटी येथे धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय वंशाच्या 8 महिन्यांच्या मुलीसह तिच्या आईवडिलांचे सोमवारी अपहरण करण्यात आले आहे. 36 वर्षीय जसदीप सिंह, 27 वर्षीय जसलीन कौर आणि त्यांची 8 महिन्यांची मुलगी आरोही ढेरी यांच्यासह 39 वर्षीय अमनदीप सिंह यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मर्सिड काउंटी शेरिफ कार्यालयाने दिली आहे.

अपहरणकर्ता अत्यंत धोकादायक

कॅलिफोर्निया पोलिसांनी संशयित शस्त्रसज्ज आणि अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या घटनेबद्दल अधिक माहिती देणे टाळले असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबातील चारही सदस्यांचे महामार्गावरील एका व्यावसायिक केंद्रातून अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलीस अधिकाऱयांनी अपहरणामागील हेतूबद्दल कुठलीच माहिती दिलेली नाही. संशयित किंवा पीडितांशी संपर्क न करण्याचा आणि नजरेस पडल्यास त्वरित 911 वर कॉल करून कळविण्याचे आवाहन अधिकाऱयांनी लोकांना केले आहे.

Related Stories

थायलंडनेही चीनपासून राखले अंतर

Patil_p

हॅलोविन फेस्टिव्हलदरम्यान दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

Patil_p

130 फूट उंच खडकावर 1200 वर्षे जुने चर्च

Patil_p

जंक फूडच्या जाहीरातींवर ब्रिटनमध्ये घालण्यात येणार निर्बंध

Amit Kulkarni

भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ परिसर हादरला

Patil_p

काबूलमधील ड्रोन हल्ला ही भयंकर चूक

Patil_p
error: Content is protected !!