Tarun Bharat

पैश्याचा वादातून व्यापाऱ्याचे अपहरण

लक्ष्मीपुरी पोलिसांकडून 24 तासात सुटका : बेळगांव येथील एक जेरबंद

प्रतिनिधी/कोल्हापूर

पैशाच्या व्यवहारातून व्यापाऱ्यास मारहाण करुन भरदिवसा त्याचे अपहरण केल्याची घटना लक्ष्मीपुरी येथील चांदणी चौक परिसरात घडली. अमृत राजेंद महाडिक असे अपहरण झालेल्या व्यापाऱयाचे नांव असून लक्ष्मीपुरी पोलिसांनी 24 तासामध्ये अमृत महाडिक यांची सुटका केली. दरम्यान या प्रकरणी अजिज मकानदार (रा. सदलगा, बेळगांव) याला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृत महाडिक यांचे ब्राईट साईट एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. त्यांचा बेळगांव येथील अजिज मकानदार यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार आहेत. यातून या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अजिज मकानदार चार ते पाच जणांना सोबत घेवून अमृत महाडिक यांच्या लक्ष्मीपुरी चांदणी चौक येथील कार्यालयामध्ये आले होते. यावेळी अमृत महाडिक व अजिज मकानदार यांच्यामध्ये वाद झाला. यावादातून अजिज मकानदार व त्यांच्या साथीदारांनी अमृत महाडिक यांना मारहाण केली. तसेच त्यांना मोटारीतून घेवून गेले. याची माहिती ऑफिसमध्ये काम करणाऱया पुनम माने यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश जाधव यांनी याचा तपास करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती केली. सिसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना जेरबंद केले. तसेच अमृत महाडिक यांची सुटका केली.

हे ही वाचा : अनैतिक संबंधातून कसबा बावडा येथे महिलेचा खून

Related Stories

कोल्हापूर : आजी-माजी मुख्यमंत्री पूर पाहणी दौऱ्यावेळी आमने -सामने

Archana Banage

प्राथमिक शिक्षकांवर आता गुगल ऍपची करडी नजर

Archana Banage

शिरढोण ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, सफाई कामगारांचे लाटले पैसे

Archana Banage

कोल्हापूर : जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद

Archana Banage

जिल्ह्यात रुग्णांचा आकडा थांबता थांबेना ; सायंकाळपर्यंत ५२ पॉझिटिव्ह

Archana Banage

आकनूर – मांगेवाडी रस्त्याचे लाखो रुपये मातीत

Archana Banage
error: Content is protected !!