ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तर कोरिया वर्षभर अण्वस्त्रांची संख्या वाढवण्यासाठी जोमाने काम करेल, असा नववर्षाचा नवा संकल्प उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी केला आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने यासंदर्भात माहिती दिली आहे.
उत्तर कोरियाने आज सकाळी क्षेपणास्त्र चाचणीने नववर्षाची सुरुवात केली. हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटरपर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर किम जोंग उन यांनी नववर्षाचा नवा संकल्प केला. वर्षभर अण्वस्त्रांची संख्या वाढवण्यासाठी जोमाने काम करण्याची शपथ त्यांनी घेतली. त्यावेळी देशाच्या आण्विक शस्त्रागारात वेगाने वाढ करण्याची गरज आहे. आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि मूलभूत हितसंबंधांची पूर्ण हमी देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीचा झटका
तसेच सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्याचा आदेशही त्यांनी यावेळी जारी केला.