Tarun Bharat

किम कार्दशियनचा पुन्हा ब्रेकअप

Advertisements

पीट डेव्हिडसन सोबतचे नाते संपुष्टात

वयातील अंतर अन् लाँग डिस्टन्स ठरले कारण

प्रसिद्ध अमेरिकन रिऍलिटी शो स्टार आणि बिझनेसवुमन किम कार्दशियन नेहमीच चर्चेत असते. काही काळापूर्वी कान्ये वेस्टपासून विभक्त झाल्यावर किम ही विनोदवीर पीट डेव्हिडसनला डेट करत होती. परंतु 9 महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर किम आणि पीट यांचा ब्रेकअप झाला आहे. दोघांनी परस्परांना पुरेसा वेळ न दिल्याने हा ब्रेकअप झाला आहे. लाँग डिस्टन्समुळे दोघांनाही रिलेशनशिपमध्ये राहणे अवघड ठरले होते.

किम आणि कान्ये यांच्यातील घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. तर पीट आणि किम यांच्यातील वयाचे अंतर ब्रेकअपचे कारण ठरल्याचे बोलले जात आहे. पीट डेव्हिडसन हा 27 वर्षांचा तर किम ही 41 वर्षांची आहे.

किम कार्दशियनने आपल्याकडे म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी यावे अशी पीट याची इच्छा होती. परंतु किमला स्वतःच्या मुलांची काळजी घेण्याकरता लॉस एंजिलिस येथे राहायचे आहे. किमला 4 मुले असून त्यांच्यापासून दूर राहत त्यांची काळजी घेणे तिला अशक्य आहे. पीटच्या हट्टामुळेच हे रिलेशनशिप किमला त्रासदायक ठरले होते.

नोव्हेंबर महिन्यापासुन किम आणि पीट यांनी परस्परांना डेट करणे सुरू केले होते. पीटने किमचे नाव स्वतःच्या शरीरावर गोंदवून घेतले होते. तर किमचा कान्ये वेस्टसोबतचा विवाह सुमारे 7 वर्षे टिकला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

Related Stories

‘बाहुबली’ सीरिजमध्ये नयनताराची भूमिका

Patil_p

कतरिना आणि विकीच्या घरी वाजणार सनई

Patil_p

‘गंगूबाई काठियावाडी’तील अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज

Patil_p

सनम हॉटलाईनला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Patil_p

क्रीतिकडून ‘आदिपुरुष’चे चित्रिकरण पूर्ण

Patil_p

रश्मिकाचा ‘गुडबाय’ ऑक्टोबरमध्ये झळकणार

Patil_p
error: Content is protected !!