वयाच्या 73 व्या वषी स्विकारली जबाबदारी ः 1969 मध्ये झाला होता राज्याभिषेक
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ-द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्सöतृतीय यांची नवे राजे म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा सेंट जेम्स पॅलेस येथे शनिवारी करण्यात आली. राजकीय नेते, न्यायमूर्ती, अधिकारी यांच्या राज्यारोहण समितीने चार्ल्स यांची राजेपदी घोषणा केली. राजेपदी घोषणा झाल्यावर राजे चार्ल्स यांनी राष्ट्र आणि राष्ट्रकुल देशांना संबोधून भाषण केले. यावेळी ते दिवंगत महाराणींच्या आठवणीने भावुक झाले होते. राज्यारोहणानंतर आता त्यांना ‘किंग चार्ल्स-3’ असे संबोधले जाईल. तसेच त्यांना वडिलांची ‘डय़ूक ऑफ कॉर्नवॉल’ ही पदवी मिळाली असून त्यांची पत्नी कॅमिला हिला आता ‘डचेस ऑफ कॉर्नवॉल’ म्हटले जाईल.
सेंट जेम्स पॅलेस येथे प्रिव्ही कौन्सिलच्या बैठकीत नव्या सम्राटांची (राजे) घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात, प्रिव्ही कौन्सिलचे लॉर्ड अध्यक्ष पेनी मॉर्डंट यांनी प्रथम एलिझाबेथ-द्वितीय यांच्या मृत्यूची घोषणा केली. ही घोषणा अतिशय शांत आवाजात करण्यात आली. यानंतर अनेक प्रार्थना झाल्यानंतर राणीची यशस्वी कामगिरी सांगण्यात आली. यासोबतच नव्या राजाच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता शाही परंपरेनुसार, चार्ल्स यांचा औपचारिकपणे राज्याभिषेक केला जाईल. हा राज्याभिषेक सोहळा कोणत्या तारखेला होणार हे सध्या जाहीर करण्यात आलेले नाही.
राज्यारोहण कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वतः राजे उपस्थित नव्हते. पण नंतर दुसऱया टप्प्यात त्यांच्या पहिल्या प्रिव्ही कौन्सिल बैठकीला ते उपस्थित राहिले. प्रिव्ही कौन्सिलचे क्लर्क रिचर्ड टिलब्रूक यांनी ‘गॉड सेव्ह द किंग’ची घोषणा करण्याआधी चार्ल्स यांची ‘किंग ऑफ द कॉमनवेल्थ, डिफेंडर ऑफ द फेथ’ अशी घोषणा केली. अभ्यागतांनी पूर्ण भरुन गेलेल्या सभागृहात क्विन कॉन्सर्ट, प्रिन्स ऑफ वेल्स, पंतप्रधान लिझ ट्रस यांनी या वाक्मयाचा पुनरुच्चार केला. शनिवारी झालेल्या राज्यारोहण घोषणा कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्याची ही पहिलीच वेळ होती.
भाषणावेळी भावुकतेचे दर्शन
माय लॉर्ड्स, लेडिज अँड जेंटलमेन, माझी प्रिय आई, महाराणी यांचे निधन झाल्याची घोषणा करण्याची दुःखद जबाबदारी मी पार पाडत आहे. तुम्ही एक राष्ट्र म्हणून आणि माझ्या मते संपूर्ण जगच यावेळेस आपल्याला कधीच न भरुन येणाऱया दुःखात सहभागी असतील याची मला कल्पना आहे. या दुःखात माझ्या भावडांकडेही अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या असून हे माझ्यासाठी मोठे सांत्वनच आहे. याच प्रकारची आपुलकी आणि आधार दुःखात बुडालेल्या माझ्या सर्व कुटुंबाप्रतीही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझी प्रिय आई माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी एक प्रेरणा होती. 1947 मध्ये माझ्या आईने आपल्या एकविसाव्या वाढदिवशी शपथ घेतली. तिला आयुष्यभर फक्त लोकांची सेवा करायची होती. जनतेला दिलेली वचनबद्धता तिने आयुष्यभर पाळली, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
दिवंगत महाराणींना 96 तोफांची सलामी
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत राजेशाही बदलही होत आहेत. राणीला आदरांजली वाहण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर मोठय़ा संख्येने लोक जमले होते. राजा चार्ल्स येथे लोकांना भेटले. अंत्यसंस्काराच्या परंपरेचा भाग म्हणून, दिवंगत राणीला शुक्रवारी शाही बंदुकीची सलामी देण्यात आली. राणी 96 वर्षांच्या असल्याने त्यांना 96 राउंड फायरिंगसह बंदुकीची सलामी देण्यात आली.