किणये : शिक्षण खात्याच्यावतीने नेहरु स्टेडियम बेळगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये किणये येथील प्राथमिक मराठी शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी यश मिळविले. महिला कुस्ती स्पर्धेत 46 किलो वजन गटात सुस्मिता राजू यल्लारी हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच वैभवी रामचंद्र पाटील हिने 39 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला. सुस्मिता हिची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना कृष्णा पाटील, राहुल डुकरे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले असून मुख्याध्यापिका मंजुळा कांबळे व सहशिक्षक, एसडीएमसी कमिटीचे प्रोत्साहन मिळाले आहे.
Previous Articleएम्स क्रिकेट सावंतवाडी संघाची विजयी सलामी
Next Article साहिल चलवेटकरची जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.