Tarun Bharat

‘आयएनएस’ कार्यकारिणीवर किरण ठाकुर बिनविरोध

नूतन पदाधिकाऱयांची निवड : अध्यक्षपदी के. राजाप्रसाद रेड्डी, उपाध्यक्षपदी श्रेयांश कुमार

प्रतिनिधी /बेळगाव

देशाची वृत्तपत्रमालकांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘दि इंडियन न्यूजपेपर सोसायटी’च्या (आयएनएस) कार्यकारिणीवर ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नवी दिल्ली येथे दि. 22 रोजी पार पडली.

संघटनेच्या अध्यक्षपदी हैदराबाद येथील ‘साक्षी’चे के. राजाप्रसाद रेड्डी यांची निवड करण्यात आली आहे. डेप्युटी प्रेसिडेंटपदावर ‘आज समाज’चे राकेश शर्मा तर उपाध्यक्षपदावर केरळ येथील ‘मातृभूमी’ आरोग्य मासिकाचे श्रेयांश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदार म्हणून ‘अमर उजाला’चे तन्मय माहेश्वरी यांची निवड झाली आहे. सेपेटरी जनरल म्हणून मेरी पॉल या काम पाहणार आहेत.

नव्या कार्यकारिणीत ‘दै. हिंदुस्थान’चे विलास मराठे, ‘डेली तंती’चे एस. बालसुब्रम्हण्यम आदित्यन, ‘दै. भास्कर’ भोपाळचे गिरीश अग्रवाल, ‘प्रगतीवादी’चे समाहित बल, ‘हिंदुस्थान टाईम्स’ पाटणाचे समुद्र भट्टाचार्य, ‘मुंबई समाचार’चे होरमुसजी एन. कामा, ‘फिल्मी दुनिया’चे गौरव चोप्रा,

‘पंजाब केसरी’ जालंधरचे विजयकुमार चोप्रा, ‘लोकमत’ औरंगाबादचे करण राजेंद्र दर्डा, ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे अध्यक्ष विजय जवाहरलाल दर्डा, ‘डेली चार्दीकल’चे पद्मश्री जगजितसिंह दर्दी, ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विवेक गोयंका, ‘दै. जागरण’चे महेंद्र मोहन गुप्ता, ‘डाटा क्वेस्ट’चे प्रदीप गुप्ता, ‘दै. जागरण’ वाराणसीचे संजय गुप्ता, ‘बिझनेस स्टॅन्डर्ड’चे शिवेंद्र गुप्ता, ‘सन्मार्ग’चे विवेक गुप्ता, ‘अजित’च्या सरविंदर कौर, ‘दिनमल्लार’चे डॉ. आर. लक्ष्मीपती, ‘वनीता’चे हर्ष मॅथ्यू, ‘संडे स्टेटमन’चे नरेश मोहन, ‘गृहशोभिका’चे अनंत नाथ, ‘सकाळ वृत्तपत्र समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘द सेन्टीनल’चे राहुल राजखेवा, ‘दिनकरन’चे आर.एम.आर. रमेश, ‘द टेलीग्राफ’चे अतीदेब सरकार, ‘नवभारत टाईम्स’चे पार्थ सिन्हा, ‘हिंदुस्थान टाईम्स’चे प्रवीण सोमेश्वर, ‘मंगलम विकली’चे बिजू वर्गिस, ‘अन्नदाता’चे आय. व्यंकट, ‘व्यापार मुंबई’चे कुंदन आर. व्यास, ‘डेक्कन हेराल्ड व प्रजावाणी’चे के. एन. तिलककुमार, ‘द स्टेटसमन’चे रवींद्र कुमार, ‘संभव मेट्रो’चे किरण बी. वडोदरीया, ‘गृहलक्ष्मी’चे पी. व्ही. चंद्रन, ‘राष्ट्रदूत साप्ताहिक’चे सोमेश शर्मा, ‘मल्याळम मनोरमा’चे जयंत मेमन मॅथ्यू, ‘मिड डे’चे शैलेश गुप्ता, ‘हेल्थ अँड अँटिसेप्टिक’चे एल. आदीमूलम, ‘इकॉनॉमिक टाईम्स’चे मोहित जैन यांचा समावेश आहे.

Related Stories

मडगाव घाऊक मासळी मार्केट सकाळी 9 बंद

Patil_p

फिनिक्स चषक 13 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा 29 पासून

Amit Kulkarni

म. ए. समिती महिला आघाडीतर्फे होमिओपॅथिक गोळय़ांचे वितरण

Patil_p

शरीरसौष्ठव स्पर्धेत नितीन पाटीलचे यश

Omkar B

सोमवारी जिल्हय़ात 18 नवे रुग्ण

Amit Kulkarni

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ कार्यक्रम उद्या

Patil_p
error: Content is protected !!