Tarun Bharat

‘हिसाब तो देना पडेगा’; सोमय्यांनी राऊतांना डिवचलं

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी करत शिवसेनेत उभी फूट पाडली. शिवसेनेवर आलेल्या या संकटाला तोंड देणारे खासदार संजय राऊत यांना आता ईडीने समन्स बजावले आहे. या समन्सवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘हिसाब तो देना पडेगा’ अशा शब्दात राऊत यांना डिवचले आहे.

किरीट सोमय्या यांनी राऊत यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझ्या पत्नीला, मुलाला, किंवा आईला कोणालाही जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा. धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या… परंतु “हिसाब तो देना पडेगा”,

पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन सोमय्यांनी हे खोचक ट्विट केलं आहे. मध्यंतरी राऊत आणि सोमय्या यांच्यातील वाद टोकाला गेला होता.

दरम्यान, ED च्या समन्सनंतर संजय राऊत यांनीही एक ट्विट करत भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मला आताच समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!” राऊत यांनी हे ट्विट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

Related Stories

देशात सलग तिसऱ्या दिवशी अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Sumit Tambekar

राजकीय हालचालींना वेग! देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीकडे रवाना

Abhijeet Shinde

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हाती शिवबंधन!

Rohan_P

कोल्हापूर : कोथळीतील वीरजवान सतीश वायदंडे अनंतात विलीन

Abhijeet Shinde

संभाजीराजे यांनी मानले फडणवीस यांचे आभार; मुंबईत घेतली भेट

Abhijeet Khandekar

गेल्या 24 तासात 1 हजार 211 रुग्णांना कोरोनाची लागण

prashant_c
error: Content is protected !!