Tarun Bharat

सोमय्यांच्या जखमेसंदर्भात रुग्णालयाचा अहवाल आला समोर

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

23 एप्रिलला रात्री राणा दाम्पत्याला (rana couple) भेटून खार पोलीस स्टेशनबाहेर पडताना भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात गाडीची काच फुटून सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली. या जखमेची मोठी चर्चाही रंगली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या जखमेबद्दल शंका व्यक्त केली होती. आता सोमय्यांच्या जखमेसंदर्भातील वैद्यकीय अहवाल समोर आला आहे.

शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. त्यावेळी सोमय्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. भाभा हॉस्पिटलने किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर मुंबई पोलिसांना त्याचा वैद्यकीय अहवाल सादर केला असून, त्यामध्ये सोमय्या यांची जखम 0.1 सेमीचा कट आहे. कोणतीही सूज नाही, रक्तस्त्रावही मोठय़ा प्रमाणात झाला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा या दाम्पत्याचा मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट तसेच सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. या दाम्पत्याला भेटण्यासाठी शनिवारी रात्री सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये आले होते. या दाम्पत्याला भेटून पोलीस स्टेशनबाहेर पडताना सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. यात गाडीची काच फुटून सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. ही जखम कृत्रिम असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून होत होता. मात्र, वैद्यकीय अहवालामुळे आरोपांवर पडदा पडला आहे.

Related Stories

“राहुल गांधींनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”

Archana Banage

सांगली : बहेत मंडळांचा सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय, खर्चाचे पैसे ‘या’कार्यासाठी वापरणार

Archana Banage

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

सांगली : फौजदार गल्ली येथे कोरोना योध्याचा सत्कार

Archana Banage

संस्कृत आणि तमिळ वाद व्यर्थ; सोडवण्यासाठी इतर अनेक मुद्दे- सोनु निगम

Abhijeet Khandekar

‘कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय’

Archana Banage
error: Content is protected !!