Tarun Bharat

सोमय्यांच्या मुलुंड येथील घरी आर्थिक गुन्हे शाखेची टीम दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई :

आयएनएस विक्रांत (Ins vikrant) वाचविण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (neel somaiya) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या पिता-पुत्र नॉट रिचेबल आहेत.

आयएनएस विक्रांत सेव्ह मोहिमेत सोमय्या पिता-पुत्रांनी जनतेकडून पैसा गोळा केला. हा आकडा जवळपास 58 कोटींच्या घरात आहे. मात्र, हा पैसा राजभवनात जमाच केला नसल्याचा आरोप निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी पोहोचली आहे. मात्र, किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या हे दोघेही अज्ञातवासात आहेत. त्यामुळे या दोघांनी चौकशीसाठी उद्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावं, अशी नोटीस त्यांच्या घरी आणि कार्यालयात देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोमय्या उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.

Related Stories

कराडात 52 हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण

Patil_p

जिल्हय़ाचा 485 कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर

Patil_p

प्राचार्यांना मारहाण करणं भोवलं; आ. बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा

datta jadhav

महा‘टुचुक’मध्ये जिल्हय़ात उच्चांकी लसीकरण

Patil_p

लॉकडाऊन १५ ते ३० एप्रिल?

Archana Banage

आण्णा गँगला मोका; गँगच्या म्होरक्यासह 9 जणांवर कारवाई

Abhijeet Khandekar