ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडी सरकारवर एका मागून एक आरोपांची मालिका सुरूच ठेवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना आता मोठा धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा (neil somaiya) अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-arrest bail application) मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान सोमवारी किरीट सोमय्यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने सोमय्यांचाही अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळ होता. त्यामुळे आता किरीट सोमय्या पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून, या दोघांना अटक होणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नील सोमय्यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती. पण, तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही.
किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, सोमवारी सुनावणी पार पडली. पण न्यायालयानं काल संध्याकाळी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. तर नील सोमय्यांच्या अर्जवर आज निकाल देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज न्यायालयाने किरीट सोमय्यांपोठोपाठ नील सोमय्यांचादेखील जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.