ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात संजय राऊत यांनी ४८ तासात माफी मागावी असा अल्टिमेटम किरीट सोमय्या यांनी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्यावर आरोप करत त्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. टॉयलेट घोटाळ्यातील (toilet scam) आरोपांवर राऊतांना ४८ तासांत माफी मागावी लागेल, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.
किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. यानंतर संजय राऊत सोमय्यांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सोमय्या आणि त्यांचा कुटुंबियांचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढू, असा इशारा दिला. या घोटाळ्याचा पुरावा म्हणून संजय राऊतांनी एक व्हिडिओही ट्वीट केला होता.