ऑनलाईन टीम/तरुण भारत
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना मढमधील कथीत स्टुडिओ घोटाळा प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि पालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत. याबाबत किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
दरम्यान, माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महानगरपालिकेला या प्रकरणी ताबोडतोब कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचीही माहिती दिली.
किरीट सोमय्यांचा हा आहे आरोप-
अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे. असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांच उल्लघन केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण येथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हते तिथे 2021 ला स्टुडिओ उभारला आहे. अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचे सांगितले जाते आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. या जागेवर पर्यावरण विभागाने सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणी साठी परवनगी दिली होती. मात्र, अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
हे ही वाचा : भारत-पाकच्या काश्मीर वादावर चीनने दिला सल्ला,चीनच्या सल्ल्यावर भारताचे प्रत्युत्तर