Tarun Bharat

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

खा. नवनीत राणा (navneet rana) आणि आ. रवी राणा (ravi rana) या दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी रात्री हल्ला केला. ज्यामध्ये सोमय्या हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

किरीट सोमय्या राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी रात्री अकराच्या सुमारास खार पोलीस स्टेशनला पोहोचले होते. याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. सोमय्या पोलीस स्टेशनमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या, चपला आणि दगडफेक सुरू केली. यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली. ही काच लागून सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. 

दरम्यान, गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली. भाजपचे काही नेते आणि कार्यकर्तेही या ठिकाणी जमले होते. जोपर्यंत तक्रार दाखल करून घेत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका सोमय्या यांनी घेतली होती. पोलिसांचा सहकार्याने खार पोलीस स्टेशनचा आवारात शिवसैनिकांनी माझावर हल्ला केला, जीव घेण्याचा प्रयत्न केला. गाडीची काच फोडली. देव कृपेने वाचलो. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून, लोकशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ पण ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तर सोमय्यांवरील या हल्ल्याविरोधात रविवारी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Related Stories

आयजीएम मधील क्वारंटाईन डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

सातारा शहरात कडक टाळेबंदी

Patil_p

एस.एम. देशमुख यांना विधान परिषदेवर घ्या

Patil_p

महाराष्ट्रात 24 तासात 1089 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 19 हजारांवर

datta jadhav

मोदींनी लाँच केल्या RBI च्या दोन नव्या योजना

datta jadhav

गोवा पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमक’ असा उल्लेख

Archana Banage
error: Content is protected !!