फोंडा : श्रृंगेरी शंकराचार्य पीठ आणि श्री दत्तसंस्थान नृसिंहवाडी यांच्यातर्फे नृसिंहवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या कीर्तन संमेलनात प्रसिद्ध गोमंतकीय कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे यांनी बहारदार कीर्तन सादर केले. यावेळी साधारण दोनशे कीर्तनकारांनी सहभाग दर्शविला. वझे बुवा यांनी आपल्या कीर्तनातून देव, देश, धर्म व संस्कृती तसेच मनुष्य जन्माचे महत्त्व, सामाजिक एकता आदीविषयांवर प्रबोधन केले. त्यांना तबल्यावर बाळासाहेब आलासकर, हार्मोनिअमवर केशवबुवा शिवडेकर, पखवाजवर आनंद मोर्ये व व्हायोलीनवर श्रीमंत गाडगीळ यांनी साथ केली. संमेलनाचे गोवा, महाराष्ट्र प्रतिनिधी वे. मू. विवेकबुवा शास्त्री गोडबोले व संयोजक मोरेश्वरबुवा सल्लोरीकर जोशी यांनी कीर्तनकारांना मार्गदर्शन केले. यासंमेलनात गोव्यातून किरणबुवा तुळपुळे, केशवबुवा शिवडेकर, नंदकिशोर देसाई, चंद्रहासबुवा जोशी व दत्तगुरु अभ्यंकर यांची उपस्थिती लाभली.
Previous Articleकृष्णेचे प्रदूषण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.