Tarun Bharat

पर्ये येथे उद्धवबुवा जावडेकर यांचे कीर्तन

Advertisements

प्रतिनिधी /सांखळी

पर्ये-सांखळी येथील श्री सप्तशती भूमिका देवी मंदिरात वार्षिक नवरात्रोत्सवानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

घटस्थापनेदिवशी गोव्याची माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने नऊ दिवसीय कीर्तन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांची आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड इत्यादी राज्यांमध्ये मिळून सात हजारांपेक्षाही जास्त कीर्तने झालेली आहेत. पर्येच्या श्री सप्तशती भूमिका मंदिरामध्ये त्यांच्या कीर्तनाला भाविक मंडळींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रतापसिंह राणे यांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ आसपासच्या गावातील मंडळींनी अवश्य घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, श्री भूमिका देवी मंदिरातील ही कीर्तने दररोजी सायं. 7 वा. सुरू होतील. या मंदिरात दररोज नवरात्रोत्सवानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, सायं. 7 वा. कीर्तन व त्यानंतर रात्री 9 वा. महाआरती व तीर्थप्रसाद होईल. कीर्तनाचा हा सोहळा दि. 4 ऑक्टो. पर्यंत चालू राहील. दि. 5 ऑक्टो. रोजी मंदिरात दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

Related Stories

शिरसई तळय़ाजवळ टुरिर-ट टॅक्सी जळून खाक.

Amit Kulkarni

हॉस्पिटलमध्ये येऊ नका, मीच तुम्हाला भेटायला येतो!

Amit Kulkarni

राज्यात कोसळल्या पावसाच्या सरी

Amit Kulkarni

ध्वनीविषयाविशेषतः नैसर्गिक आणि सभोवतालच्या आवाजांविषयी संवेदनशील असणे अत्यावश्यक : एफटीआयआयचे सहयोगी प्राध्यापक मधू अप्सरा

Amit Kulkarni

अन्वी कोरगावकर यांचा घरोघरी प्रचारावर भर

Amit Kulkarni

वाहतूक कंत्राट कायम करण्यास अखेर ‘एनक्यूब’ कंपनी तयार

Patil_p
error: Content is protected !!