सरस्वती वाचनालय-राष्ट्रधर्म प्रबोधन मंच पुणे यांच्यातर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
सरस्वती वाचनालय शहापूर कीर्तनप्रेमी मंडळ व राष्ट्रधर्म प्रबोधन मंच-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी राष्ट्रीय कीर्तन झाले. शहापूर येथील सरस्वती वाचनालयात हा कार्यक्रम झाला. पुणे येथील हभप मोरेश्वर बुवा जोशी चऱहोलीकर यांचे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनपटावर उत्कृष्ट कीर्तन झाले.
गिरीश जोशी यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वरुपा इनामदार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी हभप मोरेश्वर बुवा जोशी चऱहोलीकर म्हणाले, कीर्तनाशिवाय भक्ती होऊच शकत नाही. देशाच्या सर्वच प्रांतांमध्ये क्रांतिकारक होऊन गेले. या क्रांतिकारकांचा पराक्रम भावी पिढीला सांगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने राष्ट्रासाठी आयुष्य वेचणाऱया क्रांतिकारकांचे चरित्र समजून घेणे आवश्यक आहे.
जगाच्या पाठीवर माता म्हणण्याची प्रथा केवळ आपल्या देशात आहे. त्या मातेचे पूजन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात भूमिपूजन होते. तिला आपण माता म्हणतो. या मातेचा आदर प्रत्येकांच्या मनात असला पाहिजे. आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो. या उदात्त हेतुतून घर सोडून समाजासाठी कार्य होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी तबल्यावर यशवंत बोंद्रे यांनी तर हार्मोनियमवर वामन वागुकर यांनी साथ दिली. यावेळी बहुसंख्य कीर्तनप्रेमी उपस्थित होते.